STORYMIRROR

Vrushali Khadye

Tragedy

3  

Vrushali Khadye

Tragedy

याला जबाबदार कोण?

याला जबाबदार कोण?

1 min
433

याला जबाबदार कोण?


दिवसागणिक पारा चढतोय

ऊनाने कातडी गेली सोलून

अंगाची झाली लाही लाही

याला जबाबदार कोण ?


धरणीमाता तडफडतेय

नद्या, विहिरी गेल्या आटून

पाण्यासाठीच हा आक्रोश

याला जबाबदार कोण?


पशुपक्ष्यांचे निवारे गेलेत

सिंमेटची जंगले वाढवून

श्वापदे ही वस्तीत आली

याला जबाबदार कोण? 


झाडे आम्ही नाही लावली

फळे मग मिळतील कुठून ?

फुले अंगणी फुलली नाही

याला जबाबदार कोण?


घाणीचे साम्राज्य येथे तेथे

स्वच्छतेचे नारे गेले विरून

रोगराई तर वाढतच गेली

याला जबाबदार कोण?


रहदारीचे नियम नाही पाळले

अपघात घडतात क्षणोक्षणी

कवडीमोल झाले मरण जणू

याला जबाबदार कोण?


पैशासाठी माणूस हा धावतोय

अंतरीचा ओलावा गेला सुकून 

वृध्दाश्रम हे वाढतच चालले

याला जबाबदार कोण?


अन्नासाठी उपासमार होतेय

शिजवलेले अन्न वाया घालवून

कुपोषितांचा आकडा फुगलाय

याला जबाबदार कोण?


याला जबाबदार मी अन् तू

बदलू या आपले आचरण

जपू "वसुधैव कुटुम्बकम" मंत्र 

जीवनात होईल परिवर्तन


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy