या सरत्या वर्षात
या सरत्या वर्षात
या सरत्या वर्षात अनेक
सुखदुःखाच्या आठवणी
आप्तस्वकीयांच्या जाण्याने
दाटून आले नयनी पाणी
महामारीच्या लाटेने जगी
थैमान घातले रोगानी
असंख्य जन दाना-फान
घर सोडीले अनेकांनी
या भयाण स्थितीतही
जोडीला माणुसकीच्या वृक्षांनी
समर्पणाचा भाव जपला
असंख्य दिलदार व्यक्तीमत्वांनी
माणुसकीचे दर्शन घडले
येता-जाता अनेक रूपांनी
मंदिरातला देवही दिसला
भक्तगणासाठी तव कृपांनी
स्व-स्वप्नांची राखरांगोळी
पाहीली उघड्या डोळ्यांनी
साजरी केली रे दिवाळी
दिव्याविना अनेकांनी
सकारात्मकतेच्या उर्जेचा
प्रकाश संगे घेऊनी
अपुल्या घरट्यात परतले
पक्षी झेप आकाक्षांची भरूनी
हेच एक मागणे रे देवा
सुखी ठेव सर्वास जीवनी
सुख-दुःखाचे वार झेलण्या
हिम्मत दे बळ एकवटूनी
