व्यथा
व्यथा
आज व्यथा तिने
शब्दात काय मांडली
लक्तरे साऱ्या जगाची
बघा वेशीला टांगली
उसासे किती दुःखाचे
होते कोंडले मनात
आव्हान नवं दरवेळी
ठेवलय वाढून पानात
त्या उसवलेल्या दुखांच्या
जीर्ण शीर्ण गोधडीत
जगत होती ती
हळूच दुःखांना कुरवाळीत
नाही पाहवले सुख
एवढे जगाला तिचे
विखारी विषारी डंख
थिजले जगणे देहाचे
भयाणता न भावशून्यता
दाटली फक्त मनी
आर्त टाहो तिचा
पोहोचेल का हो कानी
