व्यसनांचा भस्मासूर
व्यसनांचा भस्मासूर
आजची ही पिढी I गेली ती आहारी ॥
व्यसन ती करी I रात्रंदिन ॥१॥
मुखी तो गुटखा I भरला तोबरा I
रस्त्याला पोतारा | थुंकोनिया॥ २॥
तंबाखू मळती I चुना तो लावून I
कँसर होवून | मरताती ॥३॥
हातात सिगार I नाकातुन धूर I
होतात बेजार | खोकोनिया ॥४॥
मीठा पान खाता | सवय जडता ॥
टपरी धरता I जवळची ॥५॥
सोमरस असा I म्हणून चाखती ॥
गटारी शोधती | गावकरी ॥६॥
नेट ते संपवी I स्मार्ट फोन हाती॥
संभोग पाहती | दिसरात ॥७॥
कोणाचे ऐकेना I बापास जुमेना |
घरात राहिना I सुख शांती ॥८॥