व्यसन
व्यसन
व्यसन
व्यसनांच्या आहारी जाऊन
करु नकोस जीवनाचा सर्वनाश
मद्य,शीतपेये,उत्तेजकांचा
आवळू नकोस गळ्याला फास।
शरीर होईल अस्थिपंजर
जगण्याच्या फोल ठरतील आशा
व्याधींची देणगी मिळेल बदल्यात
अवेळीच गुंडाळावा लागेल गाशा।
कुटुंब प्रियजन दुरावतील रे
अनमोल आयुष्य जाईल वाया
क्षणिक मोहाला पडून बळी
गमावशील तू अत्तराचा फाया।
हवेच तर लागू दे व्यसन
सद्गुण सत्शील वर्तनाने
ईश्वराची अनुपम कलाकृती देह
चिरंजीव ठरू दे सत्कर्माने।
सौ सुनिता घुले
संगमनेर