STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract

4  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract

वसुंधरा-कविता

वसुंधरा-कविता

1 min
260

रात्रंदिन या धरतीवर 

कोण काम करतय 

त्यांचे अफाट कार्य तरी त्यांना कोणी विचारतय  


आता तरी सुधरा 

वास्तवतेची होऊ द्या जाणीव 

किती जीव मेले तरी येतेय का कुणाला कीव 


माझे काम नि:स्वार्थ

मला नाही भूषण 

तुम्ही तरी वाचवा आता तुमचे जीवन 


किती खर्च केला 

याचा हिशोभ झाला 

मी तुमच्याकडे कधी हिशोभ मागितला  


माझा जीव धोक्यात 

तुम्हाला माहीत असते

अनेक संकटे झेलून जगासाठी सदैव झिजते 


मी दु:ख सहते 

तरी आनंदी असते 

थोड्याशा वैफल्यात तुमचे जीवन संपते 


तुमच्यासाठी विषारी 

वायू सतत घेते 

मी मात्र तुम्हांस शुद्ध प्राणवायू देते 


मी तुम्हांस विनंती 

आवर्जून करत असते 

तुमच्या अस्तित्वासाठी मला जगवायचे असते.


वसुंधरा माझे नाव 

सर्वांना परिचित आहे 

धरतीवरचे सुख तुमच्या हातात आहे 


जगायचे की मरायचे 

तुमच्या हातात आहे 

अजूनही वेळ गेली नाही, वृक्षारोपण करायचे आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract