STORYMIRROR

Pandit Warade

Romance Inspirational

3  

Pandit Warade

Romance Inspirational

वसंत आला

वसंत आला

1 min
216

शिशिर ऋतू संपला आता

फुटू लागली नवी पालवी

स्फूर्ती घेऊन वसंत आला

मरगळ मनाची घालवी


पर्णांकुरांनी सजली झाडे

पळसही लालबुंद झाला

रातराणीची फुले सुगंधी

गुलमोहोर फुलुनी आला


फुला फुलांवर भुंगा जातो

मधु चाखण्यासाठी फिरतो

जणू नवा संदेश प्रीतीचा 

हळू फुलांच्या कानी घालतो


आंबा काजू फणस फळेही

पाणी आणते पहा तोंडाला

आमराईत कोकीळ बोले

नाचू गाऊया वसंत आला


केसात मोगऱ्याचा गजरा

मदनवारा गिरक्या घेई

प्रेमी हृदये घायाळ होती

प्रीत फुलांना उधाण येई


सृष्टी सजली फुलाफळांनी

दृष्टी बदलून पहा जरा

सरळ मनाने उत्साहाने

वसंतोत्सव करू साजरा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance