STORYMIRROR

SATISH KAMBLE

Abstract

2  

SATISH KAMBLE

Abstract

वरूणराजा

वरूणराजा

1 min
434

पावसानं घातलं थैमानं

नद्यांना आलंया उधाणं

काय करावं कळंना कुणाला

जनता झाली हैराणं


आत्ताच काही दिवसापूर्वी

व्हता ह्यो भलताच रूसला

किती वाट पाहिली सार्‍यांनी

तरी ह्यो बाबा नव्हता बरसला


हैराण होती जनता सारी

चिंतेत होता शेतकरी

मग एकेदिवशी आगमन झाले

ऐटीत याचे धरतीवरी


हा आला अन् सुखावले सारे

आनंदित झाले मनातूनी

बरसत गेला भरली धरणे

तरीही पेटला जिद्दीनी


आता मात्र नको नको

म्हणण्याची वेळ आली आहे

वरूणराजाने आता थोडे

थांबण्याची वेळ आली आहे


दिलास आनंद इतका आम्हा

आता तू निष्ठूर होऊ नको

जीवनदान तू दिलेस आम्हा

आता मरणयातना देऊ नको


महत्त्व तुझे रे जाणतो आम्ही

तू हवा आहेस रे आम्हाला

पण बरसत जा तू असा की तुझा

फायदा होईल सर्वांना


जीवन म्हणजे पाणी पाणी

तुझे नित्य आम्ही गातो गाणी

पण अतिरेक नको करूस तू रे

हात जोडतो हा मानवप्राणी...!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract