वृक्ष प्रेमाचा
वृक्ष प्रेमाचा
वृक्ष प्रेमाचा विसाव्याचा
थंड शांत सावलीचा
फुलतो गुलमोहोर प्रेमाचा
आनंद मिळतो सोबतीचा
दुरावा, द्वेष, अहंकार
न लागो ह्यांची नजर
राहो आजन्म नाते
एकमेकांना सदाबहार
वृक्ष प्रेमाचा अनामिक
नाते बंध ना बांधील
परी हवे प्रेम त्यात
दुःखे सारे हरतील
सदा बहरो हरेक ऋतूत
पाणगळती करते एकाकी
क्षण ना लाभो कुना
हा दुर्दैवी कधी बाकी
एकटा उभा वृक्षा खाली
वाट पाहतोय सोबतीची
अति जगलो एकाकी
साथ हवी आता मैत्रीची
