वृक्ष माझ्याशी बोलला
वृक्ष माझ्याशी बोलला
रानावनातून हिंडताना
अंधूक प्रकाश पडला
हळूवार,मंद ध्वनीतून
वृक्ष माझ्याशी बोलला
मीच आहे सखा तुझा
नको मला घाबरू
ठेऊ नको माझ्याशी अबोला
नको तोड तू करू
प्राणवायूचा साठा मीच
देतो ममतेची साऊली
प्राणी पक्षांसाठी होतो
मीच प्रेमळ माऊली
अधिकाधिक वृक्ष लावून
करा तयांचे पालन
आनंदाने प्रसन्न होईल
तुम्हा सर्वांचे मन
म्हणाला मला, जा घरी तू
पहाट आली जवळ
मग सांगेन, एखाद्या रात्री
मनाची माझ्या तळमळ
