STORYMIRROR

Prasad Sawant

Inspirational

4  

Prasad Sawant

Inspirational

आई वडीलांना विसरू नका रे

आई वडीलांना विसरू नका रे

1 min
196


आई वडीलांना विसरू नका रे 

त्यांना वंदन करू सारे

बालपणी ज्यांनी दिला सहारा  

जीवनात त्यांच्या प्रेम बहारा

लिहणं- वाचणं ज्यांनी शिकवले

त्यांना वंदन करू सारे

हसूत हसू मिसळले ज्यांनी 

रडूत हास्य फुलविले त्यांनी

आपले हट्ट ज्यांनी पुरविले

त्यांना वंदन करू सारे

विसरला आहात तर आठवा आता

तेच आहेत आपले पिता- माता

आपल्यासाठी ज्यांनी कष्ट सोसले

त्यांना वंदन करू सारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational