आई
आई
1 min
172
नऊ महिन्याच्या आतुरतेने
झाली आपली भेट
इवल्या डोळ्यांनी न्याहाळत
कुशीत शिरलो थेट
शिकवले तू कसे वेचावे
गव्हा-तांदळातले खडे
गोष्टी कहाण्या सांगून
दिले जीवनाचे धडे
एक चिऊचा,एक काऊचा
भरवलास तू घास
कामातून वेळ काढून
घेतलास माझा अभ्यास
माझ्या शिक्षणाचा तू
उचललास स्वतः भार
वेळप्रसंगी कठोर होऊन
दिलास मला तू मार
तूच माय,तूच सखी
तूच जन्मदात्री,जननी
तू आहेस आदर्श माझा
वसे माझ्या मनी
