STORYMIRROR

Prasad Sawant

Others

4  

Prasad Sawant

Others

गरीबांची दिवाळी

गरीबांची दिवाळी

1 min
347

प्रश्न आज पडला मला 

कशी करू दिवाळी साजरी 

हातात नाही आज रुपया

घरी लहान मुले लाजरी 


कसा जाऊ आज घरी मी 

आहेत मोकळे हात

नाही उमगत मला आता 

कधी होणार गरीबीवर मात


दिवाळीच्या हट्टपायी मुलांना 

दिला मी उगीच मार

तेव्हाच मनी प्रश्न पडला 

थोडीच माहीत त्यांना सार?


देवाकडे आहे एकच मागणे

सुख दे आम्हा थोडं 

दोन वेळचे अन्न मिळू दे

नको आता गोड-धोड


साहित्याला गुण द्या
लॉग इन