आठवण वचनांची
आठवण वचनांची
1 min
251
चंद्र ता-यांप्रमाणे असू दे
साथ ही जन्माची
नको असूया ,भांडण- तंटे
बात स्वाभिमानाची
सगे-सोयरे ,वडिलधारी,
नाती ही आदराची
नको कधीही लपवाछपवी
कळवळ दोन जीवांची
वेळोवेळी असू दे ध्यानी
जाणीव कर्तव्यांची
आनंदात हसू मिसळून देणे
पायरी ही यशाची
रक्षण करणे साथीदाराचे
जपणूक अभिमानाची
चूक भुल देत घेत
आठवण ही वचनांची
