असेल कुणीतरी....
असेल कुणीतरी....
1 min
244
कुशीत सामावून घेताच आगंतुकीने पाहणारा
न बोलताही नकळत सर्व काही सांगून जाणारा
आपल्या तेजस्वी नेत्रांनी आकर्षित करणारा
असेल कुणीतरी...
अलगद मऊ हातांनी स्पर्श करणारा
आपल्या लहान पावलांनी घर भरून टाकणारा
बोबड्या बोलीने मन जिंकून जाणारा
असेल कुणीतरी...
घर डोक्यावर घेऊन खेळण्यांसाठी हट्ट करणारा
रूसल्यावर तोंड फुगवून कोपऱ्यात बसणारा
आपल्या निरागस चेहऱ्याने भारावून टाकणारा
असेल कुणीतरी...
