STORYMIRROR

Suvarna Patukale

Tragedy

3  

Suvarna Patukale

Tragedy

वळीव

वळीव

1 min
202

भेगाळलेली जमीन

आटलेले नदी नाले

तापलेले रान अणि

सुकलेली पाने फुले

सर्वांनाच हवा होता

तो पहिला पाऊस...


काल दाटून आले ढग

बरसू लागल्या सरी

पहिला वहिला पाऊस

आली अंगावर शिरशिरी

टळून गेली संध्याकाळ

काजळल्या दिशा चारी

पाणावले डोळे तुझे

आसवे माझ्या दारी


पावसाची ही दोन रूपं

भिजवून गेली तनमन

आणखी होता तिसरा पाऊस

माहित नव्हता त्यांना पण

बाहेर कोसळणारा अाणि

डोळ्यांतून पाझरणाराही फसला

माझ्या मनातला मुका वळीव

कुणालाच नाही दिसला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy