वजन
वजन
कठीण कठीण कठीण किती
वजन घटणं बाssई
कठीण कठीण कठीण किती
पथ्याचा सुंदरसा
चार्ट बनविती
सूप सॅलड नित घेता
जिलबीही तोडितीsss
कठीण कठीण कठीण किती
जाऊनिया जिममध्ये
घाम गाळिती
परि काटा नच हलता
पथ्य मोडितीsss
कठीण कठीण कठीण किती
पनीर आणि दूधाचा
रतिब लाविती
अन जिव्हा खवळताच
तुटून जेवितीsss
कठीण कठीण कठीण किती
मेदपरिघ आटविण्या
कॅलरी मोजती
येता परि मेजवानिस
चापून जेवितीsss
कठीण कठीण कठीण किती
वजन घटणं बाई
कठीण कठीण कठीण किती!!