STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Tragedy Others

4  

शिल्पा म. वाघमारे

Tragedy Others

विठू बरस रे...

विठू बरस रे...

1 min
333

ऋतू कोरडा वाहिला

जसा आला तसा गेला

ओल सरली डोळ्यांची

श्वास चातके सोडला...||१||


मैलमैल चाललेल्या

पावलांची पायपीट

वैशाखात पोळूनिया

जमवती घोट-घोट...||२||


मन बाप आभाळाचं

यंदा का गं थिटं बाई

देई चुकारा मेघूट

विरहात काळी आई...||३||


कूस उजवाया तिची

विठू जा रे बरसून

तुझ्या आशेवर श्वास

देई सुगंधाचं दान... ||४||


डोळ्यांतून टिपूसही

आता गळेनासा झाला

माय 'गोदा' हो उशाशी

तरी कोरड घशाला...||५||


वाट माझी मी काट्यांनी

अविचारे सजवली

दोष देऊ कुणा ठायी

श्वासमाला कुस्करली...||६||


पांडुरंगा देई यश

यत्ने पाहतो सावरु

बघवेना ही यातना

चैतन्याचा दे बहरु...||७||


टाक ओंजळीत देवा

थेंब चार मोतीयांचे

दुष्काळाच्या काळोखात

दान देई उजेडाचे !!८!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy