STORYMIRROR

Pratibha Vibhute

Classics

3  

Pratibha Vibhute

Classics

विठ्ठल

विठ्ठल

1 min
385

माझा सावळा श्रीहरी

ओढ लागली भेटीची

वारकरी आतुर झाला

खुशाली विचारतो लेकीची


तुळशी माळा गळा घाली 

 चंदनाचा टिळा लेवून भाळी

पित पितांबर, कटीवर हात

शोभते मूर्ती सुंदर सावळी


भेटीची ओढ लागली हरी

खुले झाली तुझी दार सारी

आनंदाने येतील भक्तगण

पायी सुरू होईल रे वारी


तूच आमचा मायबाप विठू

करावे सदैव आमचे रक्षण

एकदा बघण्यास जीव आतुर

असेल जीवनात आनंदी क्षण


कर जोडून विठू विनवणी

जगाचे दु:ख करावे रे दूर

वारकरी येती वाजतगाजत

भक्तांच्या आनंदाला येई पूर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics