STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Abstract

3  

सुमनांजली बनसोडे

Abstract

विटाळ

विटाळ

1 min
193

विटाळ वाटतोय मला , त्या लोकांचा

ज्यांनी जातीला जन्म देऊन...

      माणसाला दुर ठेविले......

विटाळ वाटतोय मला, त्या लोकांचा 

ज्यांनी दलितांच्या वाटेवरती...

      विषारी काटे रोविले.....

विटाळ वाटतोय मला,त्या लोकांचा 

ज्यांनी पवित्र ज्ञान मंदिराचे....

      दार बंद ठेविले....

विटाळ वाटतोय मला, इथल्या संस्कृतीचा 

ज्यांनी मानवतेची राख रांगोळी केली..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract