STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy Inspirational

4  

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy Inspirational

विषय:- सिगारेटच्या वलयांत नको गुंतूस*

विषय:- सिगारेटच्या वलयांत नको गुंतूस*

1 min
365

विनवते पत्नी परोपरीने पतीला

नको अती असे धुम्रपान करुस |

ओढणा-यासवे सर्वनाश कुंटुबाचा 

व्यसनापायी उगाच नको मरुस | | १| |


सिगारेट तर जळते धूर सोडत

तुझे जाळत फुफ्फुसे आतून |

धूर करते तुझ्या सुखी संसाराचा

मरेपर्यंत सुटका नसते त्यातून | |२| |


क्षणाच्या मौजमस्ती पायी करशी

बायका मुलांसवे संसाराची राख |

सिगारेटच्या वलयांत नको गुंतूस

जिवलग,परिवाराचा धरी धाक | |३| |


तुझी चिमणी पाखरं आनंदात

खेळतात तुझ्याच सहवासात |

सर्वांना तुझीच सवय जडलीय

जीवच अडकला तुझ्या श्वासात | | ४| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy