विषय:- दु:ख
विषय:- दु:ख
ज्याने त्याने आपलंच दु:ख
निमूटपणे सोसत का रहावे?
पाहून एकास दु:खाने रडतांना
इतरांसाठी हसू का व्हावे? | |१| |
स्वार्थ या जगात सुख प्रत्येकाला
असतं हवं काही न गमावता |
दु़:ख येता गमावतो मनस्वास्थ्य
होई व्यसनी काही न कमावता | |२| |
दु:खात त्याचा सुटतो पूर्ण तोल
राहतो निराशेच्या गर्तेत भटकत |
कोणी खुशाली विचारू गेला तर
चांगुलपणाही का राही खटकत ?| |३| |
अपयशाने खरंतर जाऊ नये
हरवून दु:खात घोर निराशेच्या |
अती यश लाभता हुरळून जाऊ
नये सुखांनी किरणांत आशेच्या | |४| |
आशेच्या किरणांची दु:खात
सोशिकपणे पहावी लागे वाट |
अंधारल्या वाटेवरती उगवणार
असते सुखाची उज्ज्वल पहाट | |५| |