STORYMIRROR

Shrikant Kumbhar

Inspirational

1  

Shrikant Kumbhar

Inspirational

विसरा सर्वांना

विसरा सर्वांना

1 min
400

विसरा सर्वांना ...

पण, आई - वडिलांना विसरु नका,

पाषाण पुजलेत त्यांनी अनेक,

अरे तुमच्यासाठी पाषाण बनून...


विसरा सर्वांना ...

पण, आई - वडिलांचं हृदय तुडवू नका,

आईच्या त्या प्रेमळ नेत्रामध्ये अश्रु आणूं नका...

लाखो रुपये कमवत असाल,

पण, आई-वडीलांपेक्ष्या पैसा जास्त नाही...


विसरा सर्वांना ...

पण, काही गोष्टी पैशाने मिळत नाहीत... 

आई मिळेल परंतु, 

आईचे प्रेम मिळणार नाही...

मित्र मिळेल परंतु,

त्याग करणारा दोस्त मिळणार नाही...

मूर्ती मिळेल परंतु, 

भाव मिळणार नाही...

गुरु मिळणार परंतु, 

गुरु जवळील विद्या मिळणार नाही...


विसरा सर्वांना ...

पण, ज्यांनी माज्यासाठी विष प्राशन करून मला अमृत पाजले,

ज्यांनी माझ्यासाठी रक्ताचे पाणी केले, त्या आई - बाबाला शतशः प्रणाम...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational