STORYMIRROR

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Abstract

3  

विजय वैशाली दत्ताराम पराडकर

Abstract

विस्मरणातला बाप ...

विस्मरणातला बाप ...

1 min
434

बापाची कविता काय लिहिणार

जन्म दिला आईने म्हणून तिचेच नाव होणार


बाप - बाप झाल्यावर होतो एक पालनहार

आई मात्र होते सदैव मायेचा आधार


पांघरण्यासाठी नेहमी असते बाप नावाची चादर

एका मायेच्या हाकेने आईचीच केली जाते कदर


स्वतःच्या वाढदिवशी करतो बाप सतत काटकसर

तरीही त्याच्या त्यागाकडे नसते कुणाचीही नजर


घराकडे लक्ष देताना स्वतःसाठी नसतो त्याला वेळ

बिघडले थोडे काही - घरातलेच त्याला विचारतात काय चालालाय तुझा खेळ


नावाला मात्र उरतो तो पुरुष म्हणून माणूस

कुणाला चुकून ओरडल्यास सगळेच बोलतात त्याला खडूस


बाप असताना वाकडं बघण्याची कुणाची काय हिम्मत

बाप नसताना मात्र कळते बापाची किंमत


कधीतरी फणफणतो अंगावर काढलेला असह्य ताप

त्याच तापात जग सोडून गेल्यावर आपल्याला कायमचा 

स्मरणात राहतो तो बाप....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract