STORYMIRROR

Pallavi Dhobale

Inspirational

2  

Pallavi Dhobale

Inspirational

विश्वासाची गाथा

विश्वासाची गाथा

1 min
14.2K


कित्येक वेळा मी बिनचप्पलाची फिरले होते

लोकांच्या नजरेंपासून पाय लपवत राहिले होते

ठिगळं जागोजागी मायीनं माझ्या बसवले होते

लाज झाकाया मी तसंच अंगावर गुंडाळले होते

अनंत दुःखाला क्षणोक्षणी गटगट गिळले होते

भूक पोटात असूनही भूकेला मी मारले होते

गरीबांच्या घरात बाई मी जन्म घेतले होते

मुलगी बनून हुंड्याचा भार वरून ठरले होते

नव्हती मुभा कसली तरीही इच्छा बाळगली होती

शिक्षणाचे ध्यास मनात माझ्या पक्के ठसले होते

प्रत्येक काटेरी वळणावर कळा मी सोसले होते

उत्साह वाढवून सदा स्वतःस जागे ठेवले होते

नव्हती पाटी,पेन्सिल अक्षरं मातीवर गिरवले होते

रातच्याला चंद्राच्या सावलीत बसून मी शिकले होते

हौस दुसऱ्यांसारखी मनातून काढून फेकले होते

गरीबीचे टोमणे सहन करीत मोठी मी झाले होते

मित्र-मैत्रिणींनी माझी जागा वेळोवेळी दाखवली होती

गरीबीला मात करत त्यावेळी मी जिंकले होते

सांगावयाची इच्छा इतकीच मनी बाळगली होती

शिक्षणाने मिटते गरीबी हेच मी शिकले होते

बनून निडर विश्वास ठेवून तेव्हा मी टिकले होते

भेदभाव गरिबांना दाखवून कित्येक तुडवले होते

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational