"आलाय हा पाऊस"
"आलाय हा पाऊस"
कित्येक बळीराजांना फासांवर
चढवून आलाय हा पाऊस।।
कित्येकांच्या बायकांलेकरांना पोरकं
बनवून आलाय हा पाऊस।।
अरिष्टांत फसवून लोकांना अजिजी
करवून आलाय हा पाऊस।।
अवकाशात निखाऱ्याच्या आम्हाला
टाकून आलाय हा पाऊस।।
चालढकल करत कारस्थानांचा दाखला
देऊन आलाय हा पाऊस।।
निष्पापांच्या मढ्यांचे झुंबड एकत्र
जमवून आलाय हा पाऊस।।
तिटकारा करत सरींचा सपाटा
लागून आलाय हा पाऊस।।
निरव बनत ढगांत काळा बिछाना
ओढून आलाय हा पाऊस।।
छातीवर बडवणाऱ्यांचा कर्कष टाहो
ऐकून आलाय हा पाऊस।।
रूणझूण करत गरजत फरमान
गाजवून आलाय हा पाऊस।।
