STORYMIRROR

Pallavi Dhobale

Others

2  

Pallavi Dhobale

Others

वासनेची बळी

वासनेची बळी

1 min
13.6K


 

घर आणि काँलेज हाच रस्ता ठरलेला होता रोजचा गं आई. काँलेजातून पटकन गडबडीतआज निघाले होते मी घाईघाईने.सुनसान रस्त्यावरुन एकटीच मान खाली घालून मी जात होते. षंढाच्या नजरांना कसं सावरत स्कार्फने मुखास बांधून टाकले होते.

चालत गेले जरा थोड्या अंतरावर बसलेली होती टपरीवर आवारी टपोरी. बघत होते वेडंवाकडं वेगळंच मजला. वासनांच्या भुकांचे होते रोजचे शिकारी.

पाऊल टाकत दबकत दबकत सरसर धाडसी होऊन मी पुढे पळत सुटले. मेले मुडदे गं आई ते टाकून दिलेले. माझ्या पाठीमागे धावतच येत राहिले.

मनात भिती माजली होती. इतक्यात एकाने हात धरून मज मागे खेचले. काळोख अंधारात मज खेचत खेचत नाही सापडणार अशा ठिकाणी नेले.

अब्रूस माझ्या षंढांनी आज गं छळले. ठेवले होते सांभाळून अपवित्र बनवले. तोंड दाबून माझं अत्याचार किती केले. वासनांच्या भुकेची आज बळी मी ठरले. होईल किती दिवस असं गं आई? जळतील किती या भुकअग्नीत? कायदा असूनही का सापडते नारी निर्दयी षंढांच्या वासनेच्या तावडीत? जातेय तुला सोडून हरली गं ताकद. लढशील ना झालेल्या अत्याचारासाठी शिकवा धडा भुक्याजलेल्या शिकारांना नजरा ठेवतील चांगली प्रत्येक नारींसाठी.

..........ढोबळे पल्लवी..........


Rate this content
Log in