विश्वास एक धागा
विश्वास एक धागा


विश्वासाचा एक धागा
करी जीवन प्रशस्त
नसे विश्वास जीवनी
तर आयुष्य उध्वस्त
धागा अतूट विश्वासाचा
सुखी संसारास खास
कधी न व्हावा कमजोर
मग ,बंध रेशीम हमखास
टाके बालक पहिले पाऊल
बोट घट्ट् आईचे धरुन
ackground-color: rgb(255, 255, 255);">पूर्ण विश्वास असे तयाचा
घेईल तीच नक्की सभाळून
.
विश्वासाने सदा उचलावे
जीवनात एक एक पाऊल
परिश्रमाच्या साथीने
मिळेल यशाची चाहुल
दृढ धागा विश्वासाचा
ठेवा मनी देवावर
कोरोनाला घालवू आपण
आपल्या आत्मबलावर