STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy Others

4  

Neha Ranalkar(Nawate)

Tragedy Others

विरोधाभास

विरोधाभास

1 min
653

शीतल चांदण्या रात्री

भूलवी प्रेमवीरास चांदवा!

बसता ऊन्हाची झाप

दिसे भर दिवसा काजवा!!१


भरल्या पोटी ढेकर देता

गोड वाटे कोकीळ गळा!

भुकेल्या पामरा वाटे जसे

ओरडतो पोटातून कावळा!!२


ओसंडून वाहे पाणी

तोटी नसे ज्या नळा!

सांडणीस मारती स्वार

सुकता पाण्याविना गळा!!३


पंक्ति उठती अजीर्ण होऊन

सांडूनी खरकटे रस्त्यावरी,!

मागती भीक अशक्त पोरे

देऊ नका परी कुत्रा आवरी!!४


लेकुरे उदंड जाहली

माता गर्भपात ती करी!

नवस करी अपत्यहीन

होण्या बाळ एक तरी!!५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy