STORYMIRROR

Mangesh Medhi

Inspirational

3  

Mangesh Medhi

Inspirational

वीज

वीज

1 min
1.9K


ती पहा ती वीज चमकतेय

होती ती ही मळभात दबूनी

तेच ते रोजचे तुडवणे

कोपर्‍यातले दबके रडणे

प्रताडीत, अगतिक तीही

पण..

क्षण एक तो झाहला असह्य

धुडकावूनी लाथाडूनी निघाली

जोखड मोडूनी, मोह सोडूनी

फसवा संसार त्यागूनी

स्वाभीमानी उभी ठकली

माणूसकीचा संसार जोडूनी

निराधार कुशीत घेऊनी

शेकडोंना माय लाभली

सिंधूताइ जगी चमकली

सिंधूताइ जगी चमकली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational