विधवा स्त्री....
विधवा स्त्री....
तुझा देह जळुन गेला होता सरणावर...
ती अश्रु ढाळत राहीली तिच्या रोजच्या मरणावर।।
त्याचा संपला होता तिच्या आयुष्यातील सहवास...
आयुष्यभर ती शोधत राहीली तुझा तो भास।।
तुझ्या सोबत पाहीली होती तिने सुखाची स्वप्ने,
मांडला होता संसाराचा डाव.....
क्षणात विरली सगळी स्वप्ने,
नियतीने असा कसा घातला तिच्यावर घाव ।।
नशिबाने तिच्यावर आणली आहे अशी वेळ.....
नियतीनेही मांडला आहे तिच्यासोबत खेळ।।
तुझ्या सोबत तिचेही आयुष्य होते संपले.....
कर्तव्याचे ओझे फक्त मागे होते उरले।।
तिच्या आयुष्यात उरले खाचखळगे आणि
दुःखाच्या वाटा....
ती मात्र जगताना हसत राहीली,
आव आणत खोटा।।
जगण्याला उरला नव्हता तिच्या काही अर्थ.....
ती मात्र जगतच राहीली निःस्वार्थ ।।
रोज थकुन झुरत राहीली मनात....
तिलाही वाटते आहे आता...
जगुन काय करु या जनात।।
