STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Tragedy

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Tragedy

विधवा नारी

विधवा नारी

1 min
12K

सैभाग्याचे लेणे हरवले,

आर्धावरी ते सोडून गेले.

भाग्याचे हेच काय हे देणे,

हलाहल जिवनाचे पिले.


साथी जरी हा सोडुन गेला,

जखम झाली कशी मनाला.

कोड पडल हे काय मला,

सांगणार हि व्यथा कोणाला.


जरी हि आज एकटी आहे,

जगण्यासाठी ती आहे ठाम.

प्रवास असला खडतर,

तरी करणार तिचे काम.


मजबूत करून हे मन,

राहणार ति सदा प्रसन्न.

मान राखून या जगतात,

मिळवेल ती बघा सन्मान.


विधवेचा जीवन संघर्ष,

तिच्या जिवनाची हि लढाई.

कोणालाच कळणार नाही,

जानते मीच महान बाई.


करू या सन्मान विधवेचा,

विधवा नारी नाही असाह्य.

घडवेल ती आपले विश्व,

कराल आपण जर साह्य.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy