STORYMIRROR

Eshawar Mate

Inspirational

2  

Eshawar Mate

Inspirational

विचारांचे युद्ध पेटले

विचारांचे युद्ध पेटले

1 min
14.4K


 विचारांचे युद्ध पेटले पळा खलांनो पळा।

अज्ञानाची झोप मोडली जागा झाला मावळा।।धृ।।

मर्द मावळा खेळत नाही लुटीपुटीचे युद्ध ।

शिवछत्रपतींचे शिलेदार ते सेनानी शुद्ध।।

बहु सोसल्या बहूजनांनी विषमतेच्या झळा।।१।।

शिवतत्वाला मन जोडून, स्वार्थ अवघा सोडून।

अरी मानवतेचे गाडून, पालवी भेदांची खोडून।।

तरुणांसही लागलाच की शिवशाहीचा लळा।।२।।

परीवर्तन जगतो आम्ही शौर्याने आधीच नटलेले।

रयत आज मावळा शोधते तुफान ध्येयाचे ऊठलेले।।

दृष्टी लाभली आंधळ्यास फुले शिवमूल्यांचा मळा।।३।।

जिद्ध मानवता स्थापण्याची अन्यायास कापण्याची।

स्वातंत्र्य समता बंधुत्वाला विश्वात अवघ्या स्थापण्याची ।।

संपवून टाकू विषमतेचा गोंधळ हा सावळा।।४।।   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational