व्हाट्सअॅप
व्हाट्सअॅप
WhatsApp रे WhatsApp काय तुझा तोरा
तंत्रज्ञानाच्या युगात वेड केलंस पोराटारा!
शुभ प्रभात,शुभ रात्री आठवणीने करतोस
मनातले सारे काही मित्रांना सांगतोस
फोटो,व्हिडिओ,ऑडिओ यांनी भूलवतो
तुला पाहताच तहानभूक विसरतो
सगेसोयरे,सखेसोबती वर्षापूर्वीचे भेटती
तुझ्याच संगतीत जन्मभराचे नाते जपती
विचांराची,कलाकुसरीची होई देवाणघेवाण
गप्पाटप्पा,रेसिपी, विनोद,गाणी छान-छान
ताण-तणाव,आजारपण क्षणात होई दूर
कंटाळा,आळस,चिडचिड जाई भूर भूर
देशोदेशींच्या अनोळखींना जोडलेस तू
जवळच्यांनाही केलेस तितकेच दूर तू
सोशल मिडीयावर आज तुझाच दबदबा
संवेदनाशून्य संदेशाचा वाहतोय धबधबा!
