STORYMIRROR

काव्य चकोर

Abstract

3  

काव्य चकोर

Abstract

वेळीच हवं सावरायला

वेळीच हवं सावरायला

1 min
250

ती किती काळ फिरणार अशी, मृत थडगी छाताडावर घेऊन

लुचू लागलेली हव्यासी बांडगुळे तिच्या अस्तित्वावर घाला घालत

निघालीत तिला खोल गर्तेत बुडवायला..!!


ते ओरबाडू लागले आहेत तिच्या अनुपम हरित वस्तीला

नष्ट करू लागलेत निर्दयपणे तिच्या पोटच्या गोळ्याला

अन् घालू लागलेत अनामिक अनौरस अपत्ये जन्माला

रंग रांगोटीचा मुलामा चढवून घेऊ लागलेत नव्याने सजवायला..!!


संहारु लागलेत समस्त कुळास, तिच्या नाद मधुर झंकारास

स्वःअस्तित्व जपण्याच्या त्या भ्रामक कल्पनात

न कळणार कधी त्यांस

उरणार नाही काहीच तिच्या भग्न अवशेषात

अन् नसणार तोही, स्वतःच नवं थडगं घडवायला

आता वेळीच हवे त्याने सावरायला..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract