वेळ मिळत नाही
वेळ मिळत नाही
वेळ मिळत नाही, नुसती धावत राहते,
रात्रंदिवस चाेवीस तास,काेण कसे खर्च करते
वेळ मिळत नाही,वेळ काढावा लागतो,
गेलेला वेळ कुणी, परत असा मागताे
वेळ मिळत नाही, वेळ असताे माैल्यवान,
वेळेचं भान ठेवावे, त्यासारखा नाही ताकदवान
वेळ मिळत नाही, कामं करावी अनेक,
काळावर व्हावे स्वार, वेळेचं व्यवस्थापन करावे नेक
