वेध गुलाबी थंडीचे
वेध गुलाबी थंडीचे
वेध गुलाबी थंडीचे
कोणी येईल हा भास!
मनी काहूर माजले,
एका स्पर्शाची ही आस!
सुख हिंदोळे हे घेई,
मनी आठवण दाटे
ऊब देईना देईना
वारा हळवा पहाटे!
धुके दाटले अंगणी
दव घालती रांगोळी
लाली रविकिरणांची
प्रभा उधळे आभाळी
नभी तारकांचा साज,
निशा सजली खुलली,
पहा शिशिर तो आला,
दारी पावले वाजली!

