STORYMIRROR

Yogini "कृष्णाई"

Inspirational Others

3  

Yogini "कृष्णाई"

Inspirational Others

वेड्या आठवणी

वेड्या आठवणी

1 min
43

जगताना साथ देतात,

दुःखात आधार बनतात,

या वेड्या आठवणी,

हसतानाही डोळ्यात पाणी आणतात...


काही भिजऱ्या असतात,

काही बोचऱ्या असतात,

या वेड्या आठवणी,

अधिर मनाला आस लावून जातात...


काही सुखद धक्के देतात,

कधी पावसापरी कोसळतात,

या वेड्या आठवणी,

रडतानाही चेहऱ्यावर हसू फुलवून जातात...


काही पानांवर उतरतात,

कधी गीत होऊन बहरतात,

या वेड्या आठवणी,

डायरीत खुणांप्रमाणे उमटायला लागतात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational