वेड...!
वेड...!
कोणी म्हंटले
प्रेमात फक्त
गुलाबाचं चालतात
निवडुंगाची फुल पण
भलतीच पळतात...
मी म्हंटल
माझ्या निवडुंगाच्या फुला
काय काय सांगू तुला
तर म्हणे
काही सांगू नको मला
माझ्या धोत्र्याच्या फुला...!
निवडुंगाचे काटे त्यात
खोलवर रुतलेत
ते अजूनही तिथेच आहेत
धोत्र्याच्या बियांनी
मात्र आपले कार्य साधले
जन्माचे वेड मात्र
तिला लावले....!
