STORYMIRROR

Prashant Shinde

Action Others

3  

Prashant Shinde

Action Others

वडापाव..!

वडापाव..!

1 min
174

वडा पाव...!!

वडा पाव म्हंटल

की तोंडाला पाणी सुटत

घड्याळाच भान

पण पुरत मरत

सकाळ असो की दुपार असो

संध्याकाळ असो की रात्र असो

वेळेच महत्व पसार होत जेंव्हा

तेंव्हा वडा पावाच्या टपरीवर मन धाव घेत

नाष्टा भोजन वेळ मारू आहार

कुठेही याचा असतो विहार

चवीला कांदा मिरचीचा आधार

कोणीच घेत नाही मग माघार

तृप्तता जिभेची सहज होते

तलफ जीवाची क्षणात भागते

अब्रूची पण लाज राखली जाते

खिश्याला परवडणारी मौज होते

अप्रूप मोठे मोठ्यांना त्यात दिसते

गरिबांना ही त्याचे नवल वाटते

वड्याला पाहून डोळ्याचे पारणे फिटते

वेळेला वड्याचे महत्व कळते....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action