STORYMIRROR

Jyoti gosavi

Classics Others

4  

Jyoti gosavi

Classics Others

वैशाखातला वसंत

वैशाखातला वसंत

1 min
339

वैशाखाच्या वणव्याने

  काहिली झाली अंगाची

 तरीही सृष्टीने मात्र

 उधळण केली रंगाची


 फुलला गुलमोहर लालेलाल

 आरक्त जसे युवतीचे गाल

 सुंदर कांचन सोनेरी बहावा

 मादक त्याचा सुगंध 

मन म्हणते वाहवा 


बहावा आणि गुलमोहर

 दोघांची अशी रंगसंगती

 जसे की दोघे येती 

चैत्राच्या हळदीकुंकवासाठी 


आम्र तरुवर वसंत आला

 गाऊ लागल्या मुक कोकीला

 ऐकून त्यांची सुरेल तान

 हरपले सारे देहभान 


आंबा फणस रानमेवा 

हा तर जणू ग्रीष्माचा ठेवा

 लगबग हळदीकुंकवाची

 कैरी डाळ पन्हे खाण्यापिण्याची


 कुरडया शेवया पापड सांडगे

 करू हळुच थोडे फस्त

 बाकीचे मात्र रुखवतात

 ताईच्या सजवू या मस्त


 अक्षय तृतीयेला आठव

 ठेवूया थोडा पितरांचा

 करू जलदान अन्नदान

 नैवेद्य आम्रस पोळीचा


 शाळेला तर सुट्टीच असते

 धम्माल फक्त खेळण्याची

 थोडी दाहक थोडीशी शितल 

आठवण राहते ग्रीष्माची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics