STORYMIRROR

Archana Murugkar

Inspirational

4  

Archana Murugkar

Inspirational

गाडगेबाबा

गाडगेबाबा

1 min
293

🌹झाडू मडके हातात

बाबा गावोगावी फिरे

साधे संवाद कीर्तनी

करी गाव स्वच्छ सारे.


🌹खरा वैज्ञानिक संत

अंधश्रद्ध समाजाचा

परखड उपदेश

संत गाडगे बाबांचा.


🌹रीन कोणी काढू नका

जादूटोणा मानू नका

द्यावे शिक्षण मुलांना

देव माना माणसांना


🌹सुधारक समाजाचा

व्यवहार सचोटीचा

नदी घाट, धर्मशाळा

रूग्णालये निर्मिकाचा.


🌹घ्यावा सुज्ञान जणांनी

वसा समाज कार्याचा

थांबलेल्या विकासाचा

स्वच्छतेचा, शिक्षणाचा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational