STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

4  

Anil Kulkarni

Abstract

वावर

वावर

1 min
200

कुठे आहे देवाचा वावर

सगळीकडे प्रेताचाच वावर

सगळीकडे विषाणूचाच वावर

माणसेच काय देवांचाही वावर

बंदिस्त केला आहे या विषाणूने

पण मंदिर बंद केले तरीही देव मनातच असतो

देव देहाचे मंदिर

दगडाला शेंदूर फासला की देव होतो

माथा टेकवावे असे पाय जेव्हा नसतात

बोट धरण्यासाठी हात जेव्हा नसतात

तेव्हा श्रद्धे बरोबर अंधश्रद्धा ही फुकट मिळते

श्रद्धेच्या फुलांचा हार देवाला घालायचा की

अंधश्रद्धेचा गजरा मनगटावर बांधायचा हे ठरवता आलं पाहिजे.

लक्ष्मण रेषेची जागा जेव्हा वैधानिक इशारा घेते, तेव्हां

देऊळ बंद असलं तरीही श्रद्धा अंधश्रद्धेचा वावर

वैधानिक इशारा देऊन चालूच असतों.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract