वाटते असे का
वाटते असे का
वाटते असे का
गप्पा मारत जावे
का असे वाटते
तुझ्यात समरस व्हावे
का धडधड करते
ह्रदय निराळी काही
का पडती रात्री
स्वप्ने रोजच शाही
का गुलाब हल्ली
अधिक गुलाबी दिसतो
अंधा-या रात्री
पूर्ण चंद्रमा हसतो
का काठ नदीचा
सोडत नाही पाठ
का खेचून घेते
हिरवी पाऊलवाट
का मनाशीच मी
हसतो एकाएकी
तु समोर येऊन
म्हणते टाळी दे की
प्रेमात डुंबता
घडते विचित्र सारे
मी किती दाबतो
तरीही हास्य फवारे

