STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

2  

Sushama Gangulwar

Romance

वाट तुझी

वाट तुझी

1 min
172

आहे सारं काही 

तरी वाट तुझी मी पाहतो गं


मी तर आहे वेडा भुंगा 

तुझ्याच भोवती गिरक्या घालतो गं.....


कातर राती तुझा दिवाना 

तुझ्या आठवणीत जळतो गं


प्रतिमा तुझी जिकडे तिकडे 

उगाच मनाला छळतो गं........


लपंडाव हा प्रेमाचा राणी 

किती दिवस तू खेळती गं


खिन्न खिन्न झाले -हदय माझे 

घाव अशी तू घालती गं.......


विरहात तुझ्या बेचैन मी गं

घे एकदाचं प्राण माझं


संपून टाक पाठशिवणीचा खेळ आज.

एक झलक पाहून तुझी 


हसत हसत हा प्रेम दिवाना 

होईल अमर तुझ्या प्रेमात गं.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance