वाट पावसाची पाहून
वाट पावसाची पाहून
वाट पावसाची पाहून
अश्रू डोळ्यात दाटले
सुकलेल्या मातीचे
काळीज फाटले
नदी कोरडी झाली
रडकुंडीला आली
पाण्यासाठी जीव तिचा
कासावीस झाला
काय भाव हो या
पावसाला आला
झरे झिरवे आटली
नदीनाले गोठली
पाण्यासाठी पाखरे
नवे गाव शोधू लागली
गुराढोरांनाही आता
पाणी मिळत नाही
या नीर्ढावलेल्या पावसाला
जराही दया येत नाही
पावसा पावसा आता
नको अंत पाहू
पाण्यासाठी कुणाचा
नको जीव घेऊ
एकदा तू पावसा
मुसळधार येऊन जा
रुसलेल्या होडीला
वाहून घेऊन जा