STORYMIRROR

VINAYAK PATIL

Inspirational

3  

VINAYAK PATIL

Inspirational

वाट नवी

वाट नवी

1 min
257

कितीदा नव्याने झाली

भेट माझीच मला

नव्या वाटेवर

नव्या वळणांवर


उभा शोधत राहतो

माझ्यातला मला

पुन्हा नव्याच त्या

भासाव्या जुन्याच वाटा


चालत राहिलो

येईल त्या वाटेने

काही ना काही

हाती येत राहिले


सहज लक्ष वेधून घेतले

पुढच्या नव्या वाटेने

खूप प्रवास करायचा आहे

लगेच लक्षात जाणले


सगळंच नाही ना

पार करू शकत अंतर

ध्येय सापडलं

वाटलं थांबावं क्षणभर 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational