STORYMIRROR

Sarika Jinturkar

Fantasy

3  

Sarika Jinturkar

Fantasy

वारी पंढरीची..

वारी पंढरीची..

1 min
158

ओठी अभंगवाणी 

त्याला टाळ मृदंगाची जोड 

अनवाणी पाऊलांना लागते पंढरीची ओढ  


डोक्यावर तुळशी वृंदावन तर कोणाच्या विठुमाऊली 

सर्वांना आपल्या भेटीची जणू ओढ त्याने लावली  


हाती वीणा, वाद्यांचा गजर

 माऊली माऊली नावाचा अखंड चालू असे जागर

 

कुठे उभे रिंगण

 तर कुठे गोल रिंगण 

आषाढीला भक्तांनी फुलते पंढरीचे अंगण  


अनोखी अशी ही वाटते वारी

 मानाच्या अश्वांची सगळ्यांच्या पुढे असते स्वारी 


 चाले वारकरी इंद्रायणी 

पासून चंद्रभागेतीरी

 सामाजिक संदेश देण्याची

 पद्धत ही न्यारी  


विटेवरी उभा तो सारी 

सत्ता त्याच्या हाती

 वारकरी सारे रे पांडुरंगा

 तुझे गोडवे गाती  


ज्ञानोबा- तुकारामांचा मानाचा हा पालखी सोहळा 

वारकरी, दिंड्या- पताकांमुळे भासे आम्हा आगळा  

चंद्रभागेच्या काठी फुले हा भक्तीचा सोहळा  

वारी पंढरीची,

 विठू नामाचा गजर देई

 मनास विलक्षण आनंद हा वेगळा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy