STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Romance Others

3  

shubham gawade Jadhav

Romance Others

वाळवंटी हृदय आणि प्रेम

वाळवंटी हृदय आणि प्रेम

1 min
234

आतुरलं चातकासारखं मन माझं 

प्रेमाच्या पाऊस थेंबाला 

गंध प्रीतीचा मिळाला माझ्या 

वाळवंटासमान शुष्क हृदयाला 


जमून आले ढग प्रेमाचे

निसर्गही बहरून आला 

बरसणार प्रेम सरी हृदयावर 

मदमस्त वाराही सांगू लागला 


गर्जून बरसणाऱ्या सरींमध्ये 

मन माझं न्हाऊन गेलं 

इंद्रधनुष्य उमटलं मनात 

लडिवाळ भावनांना उधाण आलं 


 गडगडत प्रेमाच्या ढगात  

 लकाकणाऱ्या वीजा दिसत नव्हत्या 

उधळण झाली होती प्रेमाची 

दिशा साऱ्या मावळल्या होत्या 


वाळवंटासमान शुष्क हृद्यावरती 

आता प्रेम हिरवळ चढली

वेड्या माझ्या मनाला 

तुझ्यावर वेडी प्रीत जडली 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance