STORYMIRROR

Pratibha Vibhute

Fantasy

3  

Pratibha Vibhute

Fantasy

वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या शुभेच्छा

1 min
383

तू चिरंतन माऊली,

सार्‍या जगा दे सावली,

तू गोडवा नात्यातली,

सर्वास तूची भावली॥


सकलास तू प्रेरणा,

संसाराचा तू त्याच कणा,

नेत्र कटाक्षाच्या खुणा,

भुलविती सार्‍या जना॥


तू विश्वाची जननी,

तळपती सौदामिनी,

आशा प्रभावी जीवनी,

वंशद्वय उद्धारिणी॥


पतीची तू अर्धांगिनी,

घराची तूच स्वामिनी,

माता-पित्याची चिमणी,

लेकरा वात्सल्य खाणी॥


स्वरात तूच शारदा,

शब्दास तूच ज्ञानदा,

तू चित्कला सरस्वती,

सकला देई सन्मती॥


शुभदिनी देते आज सखे

वाढदिवसाच्या शुभेच्छा

निरोगी, निरामय आयुष्य

व्हाव्या पूर्ण मनोमनी इच्छा||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy